Tuesday, March 17, 2015

हे कसलं राम राज्ज्या !

हे कसलं राम राज्ज्या चाललंय 
ज्यात आपलाच माणूस आपला नाही 
तर पर्का पाठीत चाकू खोप्सतो 
याचा कोणाला अता-पता नाही 

हे कसलं राम राज्ज्या चाललंय 
पावसाचा थेंब तर सूर्याची किरण 
ठंडीची कुडकुडाट तर बेदुन्ध वारा 
निसर्गाचा स्पर्श सुद्धा आवडेना 


हे कसलं राम राज्ज्या चाललंय 
गुन्हा केल्यानी माफी नाही 
चुकांसाठी कोणाला जागा नाही 
चूक करून नम्रता तर नाहीच नाही 

हे कसलं राम राज्ज्या चाललंय 
परमेश्वराचा नाव हरवलंय 
शास्त्र सगळे ओलांडत आहे  
तुकारामाचे अभंग देखील आइकु येत नाहीत 

हे कसलं राम राज्ज्या चाललंय 
पैशाचा मागे सर्व पळत सुटतंय 
आयुष मात्र घडवायचे तर आहे 
पण आयुष्याचा आनंद कोणाला नाही हवा 

घोर कलियुगात कसलं राम राज्ज्या 
वाईट गोष्टींना सुद्धा निर्मळ बनवणारे 
या जगात चांगल्या गोष्टींना देखील वाईट करण्यात येतंय 
हे कसलं राम राज्ज्या.. 

रामाचा भक्त उंच ताठ मानेना जगतो 
पण या जगात अहंकार मानेना जगत चाललाय 
हे कसलं राम राज्ज्या चाललंय 
हे कसलं राम राज्ज्या चाललंय