Showing posts with label रामदास स्वामी. Show all posts
Showing posts with label रामदास स्वामी. Show all posts

Friday, July 18, 2014

छत्रपती शिवाजी महाराजांची गुरु भेट


समर्थ रामदासस्वामींची  कीर्ति ऐकल्यावर शिवाजी  महाराजांना त्यांच्या दर्शनाची ओढ़ लागली. त्यांच्या भेटीसाठी ते कोंढवळाच्या घाळीत गेले तेथे भेट होईल, या आशेने संध्याकाळपर्यंता थांबूनही महाराजांना स्वामींची भेट झाली नहीं. नंतर प्रतापगडावर आल्यावर रात्री झोपेतही छ. शिवजी महाराजांच्या  मनात तोच विचार होता. समर्थ रामदासस्वामी जाणूनबुजुन  महाराजांची भेट घेण्यात टाळत होते. असेच काही  दिवस गेले. एके दिवशी समर्थांच्या दर्शनाची ओढ़ .फारच वाढल्यामुळे ते भावनिमातेच्या देवळात गेले. त्या  रात्री  ते तेथेच देवीसमोर झोपले. रात्री  स्वप्नात त्यांना पायात पादुका, अांग़वर भगवे वस्त्र, हातात माळ, काखेत  कुबड़ी आशा तेज:पुंज रुपात समर्थ रामदासस्वामींचे  दर्शन झाले.  शिवजी महाराजांनी त्यांना शाष्टांग नमस्कार केला.  समर्थनी  त्यांच्या डोक्यावर हाथ ठेवून त्यांना आशीर्वाद दिला.  महाराज जागे हौंन पाहतात, तर त्यांच्या हातात प्रसादाचा नारळ होता.  तेव्हापासून ते समर्थ रामदास स्वामींना आपले गुरु मानू लागले.