Tuesday, March 10, 2015

प्रेम असेच असता !

प्रेम.. अक्षर छोटे आहे पण अर्थ मात्र अबज्ञ, जाणायला सोपे पण समजायला मात्र कठीण. प्रेम म्हणजे फक्त प्रियकर व प्रियासीचाच शब्दः नवे तर जगण्याच्या प्रत्येक ओळीचा भाग आहे. प्रेमाची एक वेगळीच पहेली आहे, ऐकून कदाचित गुंतायला सारखे होईल,पण समजायला व वर्तणूक मात्र सोपे जाईल ते म्हणजे, जगायला प्रेम लागता व प्रेमाला जग लागता. प्रेमाची उपमा करणे म्हणजे सांगायला अवघडच, एक ना विज्णारी ज्योत, तर न संपणारे मोकळे ढग, थंड गार वार्याचा गारवा. तर प्रेमावर लेख लिहिण्याचे कारण म्हणजे कि, आजच्या पिढीन मध्ये प्रेमाची किमात उणावली जात आहे. पण ज्यांना प्रेमाचा खरा अर्थ, जाणीव नसेल त्यांना तरी प्रेमाची किंमत कशी कळणार. 


प्रेम.. सगळ्यात मौल्यवान, महान, जगण्याची प्रीत, असा मला वाटते. जगण्याला कारण देणारी, जीवन जगणारी एक निरागस, गोड, सुरेख, रुचकर भावना. प्रेम होणे म्हणजे भाग्ग्या, आणि भाग्ग्या नेहमी वर बसलेला ठरवून दोघा मनांना एक आणतो, त्यांचे मिलन करतो, प्रेमाची भावना उमग्ते व ते एकमेकांवर जीवापाड, खोल निर्मळ, अबोध मनानी प्रेम करू लागतात. एकमेकांना सोबतचे स्वप्न बघून, आयुष्य रंगवायला निघतात, एकमेकांचा हाथ धरून, हसत हसत एकाच वाटेवर प्रेमाचा गोडवा घेत सुटतात. वाटेवर देखील काही दगड, काटे पायात येतात, म्हणजेच काही गुंतागुत, भांडणाचा वारा सुटतो,  काळे ढग डोक्यावर मिर्वामिरव करतात, नातं तुटण्या पूर्वीची कळकळाट होऊ लागते, अश्या प्रसंगी जो परिस्थितीला समजून, जाणून घेईल, व दोघेहि हाथ धरून कायम परिस्थिती जाणून घेतील ते खरे प्रेम. वेळ, प्रसंग कसा हि असो, प्रेम तुटता मात्र कामा नये.

प्रेमाची किंमत जणू कमी होत असल्याचे मला कळले, इतरान कडनं ऐकण्यात येते कि, प्रेम एक टाईमपास आहे, वेळ घालवणे आहे, मी या लफड्यात पडणार नाही, थेट लग्न करील, म्हणे काय तर  aarange marriage, अरे गधड्या प्रेमाच्या लफड्यात पडणार नाही असा म्हणणारा, मग लग्नाचा तरी का विचार करतो. आता पर्यंत देवानं तुझ्या डोक्यावर फुल टाकले नाही म्हणून असे बोलतात. जेव्हा प्रेमाची किंमत येईल तेव्हा देव फुलाची कळी देणार. अजून काही वेगळ्या विचाराची सुद्धा असतात कि, प्रेम- सबंध तुटले कि, प्रेमा सारखी निर्मळ शुद्ध भावनेला कठोर, उद्धट, व प्रेमाचा अपमान करत सुटतात. जेव्हा सुरळीत असतं तेव्हा सगळा प्रेमळ वाटू लागते, जग एक वाटू लागते, पण दुरावे निर्माण होताच, प्रेमाची कळी सुद्धा कठोर बोचकर वाटू लागते. 

प्रेम.. शुद्ध निर्मळ भावना, वाईट प्रवृत्ति नवेच. प्रेम म्हणजे देवानं पाठवलेला एक आनंद आहे, अपयशा पास्ना मुक्ती तर यश मिळवण्याची एक उमंग आहे, पापण्यांना झालेला स्पर्श झालेली झुळूक आहे. प्रेम होणे सोपे आहे पण त्याला सुद्धा भाग्ग्या लागता, पहिला प्रेम-सबंधच म्हणजे पहिले प्रेम नवे, पहिला प्रेम म्हणजेच तर पाहिलांदा पापण्यांना ओलावा व गोडवा होणारा स्पर्श आहे. प्रेम निभावणे ते मात्र कठीणच, पण अशक्य मात्र नाही. देवानं पाठवलेली, डोक्यावर ठेवलेली आशीर्वादाची कळी आहे, त्याला रुबाबदार फुल करण्याची शक्ती आपल्यात आहे. तर सुगंध, सुवास व तुमच्या प्रेमाची सुवासिक्ता नेहमी कायम ठेवा. प्रेम केला असेल तर ते कधी तुटू नका देऊ, कारण प्रेमात जितकी शक्ती, आनंद, श्रद्धा आहे, तितकी कश्यातच नाही. 

No comments:

Post a Comment