Thursday, March 12, 2015

वल्ली !

रडतय कोण मी तर हसतोय 
लोकान समोर खरे रूप लपवतोय 
चेहरा वर हास्य कायमचे असू देतोय 
रडतय कोण मी तर हसतोय 

रडत असलेला उंच स्वरात हसतो  
रुसलेला सगळा क्रोध विसरतो 
अड्थळात असलेला वाट मिळवतो 
जगाला घाबरलेला जीवन जगतोय 

कधी हत्ती वरची सवारी 
तर कधी झुल्यात माझी लय भारी 
घोड्यावरची मिरवणूक 
हीच माझी दुनियादारी 

स्वताचे दुख: थोड्या वेळ विसरून 
अफाट लोकां समोर उत्तम कामगिरी 
उंच उड्या घेऊन जनतेच्या मनात शिरून 
व मनोरंजन करणे 

माझे कामच विनोद करणे 
चेहरा चमकवून लोकांना मनोरंजन करणे  
रडलेला चेहरा पण मग लागे हसरा   
थकलेला वल्ली पण होई उत्सुक सदा  

 वल्ली देखील हा एक मनुष्यच 
उधाण वार्या नंतर पाण्यात वाहणारच 
खोल अंतरी घुसमटलेला असून 
मरे पर्यंत सगळ्यांना नेहमी हस्व्नारच 

निष्पाप असलेल मन 
जसे फुलाने भरलेले त्याचे वन 
सगळ्यांना हास्य वाटणारा 
हा असा वल्ली