Saturday, February 21, 2015

आतुरता!

आतुरता स्वप्न रंगोणारी आतुरता
आता मन शांत बसणार नाही .. बस रमत राहील
चेहरावर एक गोड निरागस हास्य आला आहे
आतुरता कधी न झालेली कधी ना संपणारी

कोणाला सांगायचे मन करत आहे
कोणासोबत भावना व्यक्त करावेसे वाटत आहे
शब्द मुखात आनंदानी मारामार करत आगे सांगायला
पण कोणी सोबत नाही ते ऐकायला


आनंद झाला जेव्हा यशाचा झेंडा फडकला
खूप काटे रुतले हे यश मिळवायला
मन ठिकाणावर नाही.. डोके जागेवर नाही
तर कोणाला माझे यश कळवायला सोबत कोणी नाही

कधी घरी कळवतो
कधी आई वडिलांच्या पाया धरतो
आवाज मनात गुणगुणत
अशीही आतुरता माझ्या ध्यानी मनी झुळत आहे