Tuesday, February 10, 2015

मफ्फी : काही शेवटचे शब्द

कविता करताना जेवढा आनंद होतो आहे
तितकच मात्र दुख सुद्धा
पाच महिन्या आधी हसत खेळत
शुद्ध मनानी त्याला समोर बसवून
लिहिलेला त्याचा वाढदिवसा निमित्य लेख

तूर-तूर  आला, येताच गणपती बाप्पा शोधू लागला
बघताच त्यांचा पाया पडू लागला
जितकी बाप्पाचा वाहना ची श्रद्धा
तितकी नक्कीच कोणाची नाही

का रे इतक्या लवकर गेला?
आमच्या दूर, एक-एक पाउल मागे गेला
क्षणो क्षणी तुझी आठवण येते
डोळ्यात सतत तुझी झुळूक दिसते

आई तुला हाक मारते आहे
तुला कुशीत झोपवण्यासाठी सतत रडत आहे
आईची माया बघून तरी परत ये
परत आपला सुख सौन्सार घडू दे

बाबा कामावरना आल्यावर तुझा नाव घेतात
तर त्यांना तू दिसत नाही आहे,
इकडे-तिकडे बघतात, तुला शोधतात
नंतर तू ना दिसल्यास, तुझ्या गोष्टीच करतात

मला रात्री विचार येतो, इथे रोज रात्री गुडाळून चादरीत झोपायचा
आणि आज पसना तू एकटा घरा मागच्या लिंबाचा झाडा खाली
कडकडून झोपशील, थंड मातीत, थंड वातावरणात एकटा राहशील

तुला तरी कसा काय जाणवणार , तू नक्कीच मनुष्याचा जन्म घेतला असणार
सद्गुरूंचा आशीर्वाद, त्यांचा वातावरणात जीवन जगलास तू
अफाट प्रेम दिला, आणि समोर सुद्धा नक्कीच देशील
कारण तुझा आत्माच प्रेमळ आहे, इतका तर दीड वर्षात तुला ओळखलंच आहे

तरी तुझी आठवण येते रे मफ्फी ,

दुसर्या रुपात तरी ये पण आपल्या सौसारात परत ये!