Thursday, February 5, 2015

धर्म माणुसकी चा!

आजच्या या युगात काही वेगळच सुरु आहे 
हिंदू-मुस्लिम-सिख-इसाई यांचे वेग वेगळे झेंडे फडकत आहे 
धर्म जात पात नि अख्खा जग वेगळा केला 
आपल्या माणसाना सगळ्यांना दूर केला 

प्रत्येक धर्म नि आपला देव उभा केला 
देव घरे बांधलीत, हिंदू  चे म्हणे मंदिर, 
मुस्लिम चे मस्जिद, इसाई चे चर्च,
असे करून आज मनुष्य खरा देव हरवला 


देव एकच आहे, देवाचा संदेश देखील एकच आहे 
मग का इतका जाती धर्माचा खेळ?
या मुळे  मत-भेद वाढलेत 
म्हणून माणूस दूर होऊन, माणुसकी हरवली आहे 

कुठे तरी, खूप दूर, माणुसकी चा आता पत्ता नाही 
किती शोधले तरी सापडणार नाही 
जेव्हा सगळे धर्म भ्रष्ट होऊन एक होतील 
आणि फक्त माणुसकीच्या धर्माचा झेंडा फडकेल 

देवानी फक्त एकच संदेश दिला आहे 
आत्मा देवाचे रूप, आणि तो प्रत्येक मनुष्यात आहे 
माणसां माणसा वर प्रेम करा, व 
माणुसकी कायम ठेवा 

ना हिंदू  ना मुस्लिम ना सिख ना इसाई
आता फक्त एकच धर्म, तो म्हणजे 
              माणुसकी!