Monday, February 16, 2015

कल्पना!

मनाला काही विचार सुचले 
एक गोड कल्पना सुचत.. बस वाहत गेली 
मी शब्द दिले कवितेला 
कविता तालबद्ध जगत जगली 

कविता समोर झुळत निघाली 
शब्द आपोआप पाना वर रंगू लागले 
ओळी पाण्यासारख्या सुटत सुटल्या 
तेव्हा कवितेला एक वेगळीच कल्पना मिळाली 


ओळी शब्दांना मिळत गेल्या 
शब्द खोल मनात रमत गेले 
काही आयुष्याच्या गोष्टी आठवून 
कल्पना कवितेवर ऒञ्झ पसरली 

कविता तालात सुरात हसत खेळत 
पावसा सारखी बरसली, पक्षान सारखी गुणगुणत 
बस कानाला मधुर तर मनाला शांत करत बसली 
अशी हि कल्पना कवितेला आधार देत होती  

काही शब्द खोल आत शिरले 
तर काही ओळी रक्तात बुडत 
परत आयुष्याच्या प्रेमळ आठवणी 
कोर्या कागदावर सहज पणे उतरले 

कविता कल्पने शिवाय पूर्ण नसते 
रमली नाही तर अपूर्ण असते 
जेव्हा सगळ जग विसरून कवितेत वाहत गेलात 
मग ती कविता जगायला नवे अस्तित्व देते.