Friday, January 9, 2015

शब्दांचा खेळ!

शब्द म्हणजे नक्की काय ?
शब्द म्हणजे तत्त्वज्ञानाची भाषा 
कधी मधुर तर कधी कठोर 
कधी रुबाबदार तर कधी प्रेमळ लागणारी परिभाषा.

शब्द कधी कोणाला आनंदी करतात 
तर कोणाला कधी  नाराज देखील करतात
खोटा बोलणारे हे शब्द आणि 
खरा लपवणारे  हे शब्द.


व्यक्त केलेल्या भावना सांगणारे शब्द 
भावना दुखवणारे देखील शब्द 
जाणून बुजुण मनाला ठेच पोचवणारे  शब्दः 
मनाला शांता करणारे देखील हे शब्द.

नाता जुळवणारे शब्द
गोड सुरवात करणारे  
कधी हसरे तर कधी लाज़रे
मनातना उमगणारे हे शब्द.

ते म्हणतात ना...
तलवारि पेक्षा शब्दात जास्त ताकत असते 
म्हणूनच आयुष्य जगवणारे हे शब्द.  

शब्द शब्द जुळून बनतात वाक्य
वाक्य जुळून बनतात काही लेख 
तालबद्धा असणाऱ्या या गोड गोड 
हरवून देणाऱ्या अश्या या कविता.

No comments:

Post a Comment