नदीच्या काठी बसलेला मी..
कड़क उन्हाचे चट्के खाणारा मी,
नदीला दुष्काळ पडलेला, पक्ष्यांचा आवाज हरवलेला..
पावसाची वाट पाहात बसलो,
तेवढ्यात ढग काळे होऊन थंडा गार वारा सुटला.
झाडाची पाने सैरा वैरा झुळु लागली..
पावसाचा सन्देश आला,
देवाने मनातली प्रार्थना ऐकल्याचा दिलासा दिला.
पावसाचे पाहिले थेंब माझ्या डोळ्यांवर पडले,
मनाची शांति पटली व मन पावसानी भिजले.
सगळे पक्षी बाहेर आले, पावसाच्या तालात नाचू लागले,
गाणं गुंनगुणात पक्षी आकाशात खेळू लागले.
पाऊस सैरा वैरा पळत सगळ्यांना आपली भेट देउ लागला..
कधी डोंगरावर तर कधी नदीच्या काठी,
कधी खुल्या मैदानात तर कधी घनदाट जंगलात.
आयुष्यात आणणारा हा पाऊस..
सुख समृद्धि देणारा हा पाऊस,
मनात शिरून मन थंड करणारा हा पाऊस.
मन ओळखणारा हा पाऊस..
प्रेमाची ओढ़ लवणारा हा पाऊस..
प्रेमाची आठवण करूँ देणारा हा पाऊस..
तर असा भावना ओला करणारा हा पाऊस…
No comments:
Post a Comment