Tuesday, September 23, 2014

प्रेमाची भावना!

मनात एक असा  विचार आढळला..
एकदा एक प्रसिद्ध लेखकः बनून,
तुला मिळवायचे, तुला जिंकायचे..
आणि फक्त तुझ्यावर प्रेम करायचे. 

माझे मन हरवले तुझ्यासाठी..
तुझी वाट बघत आहे एका अतूट मैत्रीसाठी, 
ते कुठेना कुठे मिरत आहे तुझ्या भेटीसाठी.. 
माझे मन हरवले फक्त तुझ्यासाठी.


आधी, तुला शोधून मन विचलित असायचे..
आता, तुला मिळवण्यासाठी मन विचलित आहे,
कधी तुझ्याशी संवाद साधतो अशी ओढ़ लागली आहे..
कधी  माझ्या मनातले तुला कळवतो असे वाटू लागले आहे.

एक गोड स्वप्ना बघता  बघता आज इथवर येऊन पोहोचलो..
आज देवाच्या कृपेने सगळा मिळवून चुक्लो,
तरी कुठे  कश्यात मन लागत नाही..
कारण तुझ्या शिवाय कधी कुठे यश जाणवत नाही.

शेवटी मनाला हे पटवूनच द्यावा लागला..
की आपले नाते फक्त मनातच राहिले,
हे नाते कोणाला कळु न देता.. 
बस मनातच जगत राहिले. 

माझे मन हरवले तुझ्यासाठी..
तुझी वाट बघत आहे एका अतूट मैत्रीसाठी, 
ते कुठेना कुठे मिरत आहे तुझ्या भेटीसाठी..
माझे मन हरवले फक्त तुझ्यासाठी.