Wednesday, September 10, 2014

मफ्फी: कुटुंबातला एक सदस्य

हा विषय आज आमच्या कुटुंबातल्या एका सदस्याचा आहे. एक वेगळीच उत्सुकता, ओढ़ मनाशी दाटली आहे. ह्या विषयाची सुरवातच कुठून करावी असे काळेनासे झाले आहे. आता पर्यन्ता काही लेख लिहिलित काही कविता देखील लिहिल्यात, पण या विषयावर लेखन करण्याचा वेगळाच अनंदा होतो आहे. मागल्या वर्षीचे स्वप्ना आज पूर्ण होत आहे. एक विचार मनाशी निश्चिन्त केला होता, की  कुटुंबात एक पाळीव प्राणी पाळावा व त्यावर त्याच्या सुंदरतेवर, त्याच्या हाल-चालींवर लेखन करावे. तर आज ते स्वप्ना पूर्ण होत आहे असे आनंदाने म्हणू शक्तो.

तर मित्रांनो, इत्यादिन कड़े एक पाळीव प्राणी पाळले जातात. कुत्रा, ससा, मांजर, व  बरेच पाळीव प्राणी. माझ्या कुटुंबात सुद्धा एक वेगळा सदस्य आहे, उंदिर. त्याला कुणी उंदीर म्हंटलेले  आमच्या कुटुम्बकांना पटत नाही. जात त्याची वाइल्ड डोमेस्टिक. रंगा त्याचा पांढरा, मोत्या सारखे लाल डोळे, नाज़ुक- साज़ुक़ कान, चिमणी सारखे पाय, व लाम्ब लचक शेपुट. कुणासाठी तो मनु, तर मफुली, मफ्फी, माफ़ी तर माफिया. खर तर आम्ही त्याला प्राणी म्हणून कधी मानलेच नाही. आई- बाबांचा धाकटा मुलगा, माझा व दादाचा भाऊ व आजीचा नातू व अजुन इतर नातेवाईकांशी त्याचे नाते जुळलेले आहेत.


आमच्या कुटुंबात फक्त माझ्या परवांगिने आलेला मफ्फी. त्याच्या येण्याद्धि घरात बरेच वाद झाले. आणल्यावर त्याचे सगळा कोण करेल? घरी पाहुणे येतील तर घाबरतील, अशे छोटे - मोठे प्रश्न उभे रहिले. पण मी माझ्या निर्णयावर ठाम उभा राहिलो. ४-५ दिवसांनी घरी कुणी नसलेले पाहून मी त्याला आणले. त्याला खायला दिले, व त्याला त्याचे पूर्ण घर दाखविले. त्यावेळी फक्त कुटुम्बात कोण? हां त्याला प्रश्न पडलेला. त्याचे सौंदर्याच इतके की, मी अस परवानगी शिवाय त्याला आणले त्याचा  कोणालाच राग आला नाही. सगळे त्याच्याशी खेळू लागले, व त्याला आपली ओळख देऊ लागले.  त्याच क्षणी विचार पटला की, एक मुक जनावर सुद्धा आनंदा देऊ शक्तो.


जसे जसे दिवस पुढे गेले, तशी त्याला ओळख सगळ्यांशी पटु लागली. कोण आपले आई-वडील, कोण आपला भाऊ, कोण आपली आजी हे त्याला समजू लागले. सगळ्यान सोबत जेवण्याची वेळ त्याला कळु लागली. आज त्याला एक वर्षा झाला, एका वर्षात बरेच काही त्याला कळु लागले असे नक्कीच म्हणू शक्तो. आणि त्याला कधी काय हवे आहे, हे सुद्धा आम्हाला कळु लागले. जेव्हा कुटुंबातला एक व्यक्ति कुठे बाहेर गावी गेलेला असतो, तेव्हा त्याचा चेहरा उतरून जातो, बाबांना रोज़च्या वेळेस घरी येण्यास उशीर झाला तर दाराकडे बघून त्यांची वाट बघु लागतो.
एक दोन ओळी तुमच्या पुढे व मफ्फीच्या वाढदिवसा निमित्ता मांडतो, 


आला रे आला आमच्या कुटुंबात आला  
 गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी आला..
येताच  आनंदाची चादर पस्रावु लागला ,
 आला रे आला आमच्या  कुटुंबात  आला..

त्यानी स्वताशी बऱ्याच काही सवाई लावून ठेवल्या आहेत, कोणी बाहेरून आले तर आधी त्याचे लाड करावे, काही त्तरी खाऊ त्याच्या साठी आणावा, बिस्कुट सुद्धा फक्त मोज़क्या ब्रांड्सचेच हवेत, एक दिवस ही मुरमुरे घरी नसल्याचे चालणार नाहीत व खोलीत एकटा सोडून जाणे हे सुद्धा चालत नाही, पिंजऱ्यात सुद्धा काही घान पणा व ओल असलेला चालत नाही, अश्या बऱ्याच सवाई त्यानी लावून ठेवल्या आहेत

जनावर माणसाच्या प्रेमाची भुकेले असतात. त्यांची फक्त एकच मागणी असते ती म्हणजे, कुणी त्यांच्या पाठीवरना हाथ फ़िर्ववा, त्यांचा लाड कारावा. जेव्हा आपण एका पाळीव प्रणाला घरी आणून त्यांना आपण काही खायला  देतो, त्यावरच ते आपले होऊन जातात. क्षण भरातच त्यांचात आपल्यासाठी विश्वासची व प्रेमाची भावना उमगते, ही समजूत एका मनुष्यात देखील नाही, जीतकी एका मुक्या जनावरात. हे  तर आमचे व मफ्फीचे भाग्यच म्हणावे की आमचे ऋणानुबंधला एक गोड सुरुवात झाली व आज वर्षा देखील झाला. सतत मनात एकच विचारचक्र सुरु असते, की काही आमचे पुर्वजन्मीचे ऋणानुबंध असावेत. 
  
पुर्वजन्मीची पुण्याईमुळे आपले ऋणानुबंध जुळलेत..

तुझा नि आमचा साथ असच प्रत्येक जन्मी असू दे..

हेच वाढदिवसाचे आशीर्वाद सगळ्यां काढून।