Wednesday, October 15, 2014

निसर्ग: एक वेगळाच आनंद

आणि रिम-झिम्णारा पाऊस थांबला..
आणि रिम-झिम्णारा पाऊस थांबला..

एक सकट पक्ष्यांचा कळप बाहेर पडला.. 
सगळे पक्षी गाणी गुण-गुणात सैरा वैरा पळाली, 
व आनंद व्यक्त करू लागली.

आणि तितक्यात सूर्य उजड़ला..
आणि तितक्यात सूर्य उजड़ला.. 

वन, प्राणी, मनुष्य प्रत्येकाला आपली भेट देऊ लागला..
व अक्खा निसर्गावर आशेची किरण उमगु लागला.

मित्रांनो, निसर्ग म्हणजे.. 
निसर्ग म्हणजे जीवन जगण्याचे अनेक कारण..
गंगा आणि गोदावरी यांचे संगम, 
रात्रि चन्द्र तर सकाळी सूर्याचे आगमन.. 
असा हा निसर्ग


निसर्ग म्हणजे..
निसर्ग म्हणजे वना मुळे मिळणारा गारवा.. 
थंड गार वाऱ्या मुळे मिळणारे सकारात्मक विचार, 
ओला चिंबा असलेला मोगरा शेवंतीचा सुवास..
असा हा निसर्ग

निसर्ग म्हणजे.. 
निसर्ग म्हणजे पक्ष्यांचे ते चिउ चिउ गाणी.. 
ओल्या मातीचा तो विलक्षण सुवास,
नदीच्या काठी येणाऱ्या कवटळणाऱ्या लहरी.. 
असा हा निसर्ग

निसर्ग म्हणजे.. 
निसर्ग म्हणजे आकाशाचा रंग निळा.. 
आंब्याच्या पानाचा रंग हिरवा, 
पावसाच्या थेम्बाचा रंग वेगळा.. 
इंद्रध्नुष्यत रंगच सगळा. 
असा हा निसर्ग