Monday, August 18, 2014

जन्माष्टमी : एक उत्सव

आजचा हा विषय सगळ्यांच्या आवडीचा व सगळ्यांचा लाडका परमात्मा आनंदा व्यक्त करून जीवन जगणारा श्री कृष्ण. सर्वप्रथम सगळ्यांना खुप खुप जन्माष्टमीच्या हार्दिक सुबेच्छा. आज अवघ्या भारतात हा सण आनंदाने व पूर्ण श्रद्धेने साजरा केला जातो. तर, आजच्या या आनंदमय दिवशी मी तुमच्यापुढे श्री कृष्णा जन्मीपूर्वीच्या गोष्टी व श्री कृष्णाचा जीवन संदेशा बद्दल काही सांगू इच्छितो.

तर मित्रांनो, श्री कृष्णाचा जन्म भाद्रपदच्या मध्यरात्रि रोहिणी नक्षत्रत कृष्णा अष्टमीला देवकी व श्रीवसुदेव यांच्या पुत्र रुपात झाला. कंसाने आपल्या मृत्यूच्या भीति बाबत देवकी व श्रीवसुदेव यांना कारागर मधे कैद करून ठेवले. कृष्णा जन्माच्या वेळी अत्यंत वर्षा हु लागली. देवाच्या निर्देशानुसार श्री कृष्णला रात्रीच मथुरा कारागर गोकुल मधना नन्द बाबांच्या घरी घेऊन गेले. 


नन्द यांच्या अर्धांगिनी यशोदा यांना एक कन्या झाली होती. वसुदेव श्री कृष्णांना जवळ झोपवून व त्यांच्या कन्न्याला सोबत घेऊन आले. कंसा ने त्या कन्याला वसुदेव व देवकीची संतान समजून मारून टाकण्याचे ठरवले, पण यात कंसा असफल ठरला. सुदैवाने कन्नयचे प्राण वाचले. पुढे श्री कृष्णाचे लालन-पालन यशोदा व नन्दनी केले. श्री कृष्ण तरुण झाल्यास त्यानी कंसाचा वध केला आणि आपल्या माता-पिता देवकी व वसुदेव यांना कारागर मधून मुक्त केले. 

तर मित्रांनो, श्री कृष्णाचा स्वभाव नेहमी हासणारा, अनंदा व्यक्त करणारा, व सगळ्यांच्या खोड्या काढणारा. कधी कोणाच्या मिश्या व वेणी एक करणे, तर कधी कोणाला नदीत पाडणे, कधी कोणाला चिडवणे, तर कोणाच्या घरात शिरून लंंंंयाचे गोळे चोरून खाणे. अश्या प्रकारे श्री कृष्णलीला सुरु असायचे. असा आनंदी स्वाभाव असलेला कृष्णाचे हज़ारो नाव होते, जसा बाळ गोपाळ, कान्हा, नंद किशोर, श्रीरंगा, गोविंदा अश्या अनेक नवांनी श्री कृष्णला मानले जाते. 

तर मित्रांनो, भगवत गीता हा ग्रन्थ निव्वळ श्री कृष्णा वर आधारित असल्याचे तुम्हाला ज्ञानं असणारच. हा ग्रन्थ वेद व्यास यांनी लिहिला आहे. भगवत गीता मधे जन्मा पासना ते पुनर जन्मा पर्यन्ता संगितले आहे. भगवत गीते मधे परमात्मा श्री कृष्णानी म्हंटले आहे की, " मीच सगळ्यांची सुरवात आहे, मी सुरु होणारा पूर्वीचा आहे, आणि सगळा संपला तरी मी राहणार. सगळे माझ्यात आहे आणि मी सगळ्यात आहे. जे पण तुम्ही पाहू शकतात, स्पर्श करू शकतात या सगळीकडे मी आहे." भगवत गीता हे सुद्धा सांगते की, आत्मा अजन्मी आहे, आत्मेला कोणी मारू शकत नाही, फ्हेकु शक्त नाही, कापू शक्त नाही. पण आत्मेला परमात्मा सोबत ठेवण्यासाठी परीक्षा रूपी जीवन जगावेच लागेल. श्री कृष्णानी भगवत गीते मधे सांगितले आहे की, निर्मळतेने वागा, राग करू नका, आनंदमय व उत्सव पूर्ण जीवन जगा. जर या जन्मी पुण्य मिळवाल, तरच पुनर जन्मी चांगले जीवन प्राप्त कराल. 

श्री कृष्णानी सगळ्यानाच बराच मदतीचा हाथ दिला, व सगळ्यांशी आदरपूर्वक वागले आणि असे भरपूर चमत्कार केले ज्यानी लोकानची श्रद्धा अजुन श्री कृष्णा वर वाढू लागली. तसा म्हंटला गेले तर, श्री कृष्णा हाच खरा परमात्मा. 

तर मित्रांनो, जन्माष्टमी साजरा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे असा की हा सण परमात्माचा सण मानला जातो. या दिवशी श्री कृष्णाला गोपाल-कालाचा नैवैद्य अर्पण केल्या जातो व तरुणनंमधे दही हांड़ीची स्पर्धा खेळली जाते. भारत देशात हा सण पूर्ण जल्लोष आणि श्रद्धेने मनवल्या जातो. 
                       श्री कृष्णच सर्व काही निर्माता आहे.