Saturday, August 16, 2014

मराठी भाषा : अवघ्या महाराष्ट्राची मातृभाषा

मराठी भाषा आमची मायबोली - म्हणजेच मातृभाषा. प्रत्येकाला आपल्या मातृभाषेचा कौतुक असते. हा लेख लिहिण्याचे मुळ कारण म्हणजे, मला असा वाटते आहे की काही तरुणां मधे मराठी भाषे बद्दल चा अभिमान किव्वा मराठी भाषे बद्दलचे महत्व दिवसें दिवस कमी होत चालले आहेत. तर या लेखात मी पूर्ण मराठी भाषेचा इतिहास सांगू इच्छितो.

मित्रांनो, भारतात अनेक भाषा बोलली जातात जस हिंदी, इंग्रजी, तेलगु, आसामी आणि इतर काही.  भारताच्या राज्यघटनेतील २२ अधिकृत भारतीय भाषांच्या यादीत मराठीचा समावेश आहे. मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्यातील एकमेव अधिकृत राजभाषा आहे.  मराठी भाषेचा
उदय संकृतच्या प्रभावाखाली निर्माण झालेल्या प्राकृत भाषेच्या महाराष्ट्री या बोलीभाषेपासून झाला. असे  बहुतांशी मानले जाते. पैठण येथील सातवाहन साम्राज्याने  महाराष्ट्री भाषेचा प्रशासनात वापर सर्वप्रथम केला. देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषा व संस्कृतीची भरभराट झाली. ई. स. ११८८ मध्ये मुकुंदराज या कवीने विवेकसिंधु या काव्य ग्रंथाची रचना मराठी भाषेत केली. त्यानंतर ई. स. १२९० मध्ये ज्ञानेशवरी या ग्रंथाची रचना ज्ञनेश्वरांनी केली. यंत्र महानुभाव संप्रदायने मराठी साहित्यात मौलिक भर घातली. संत एकनाथ यांनी या भाषेत भारुडे लिहिली आणि एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आदि ग्रंथाची भर घातली. 


शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवली आणि पेशव्यांनी या सम्राज्याचा विस्तार केला. त्यानंतर मराठी भाषेस राजाश्रय मिळाला. ई. स. १९४७ नंतर स्वतंत्र भारत देशाने मराठीला अधिकृत राज्यभाषेचा दर्जा दिला, ई. स. १९६० मध्ये मराठी भाषिकांच्या एकसंध महाराष्ट्र राज्यास मान्यता मिळाली आणि मराठीस राजभाषेचा मुकुट प्राप्त झाला. ई. स. १९३० पासून मराठी साहित्य संमेलन सुरु झाले. मराठी साहित्यिकांनी १९९० च्या दशकपर्यंत मराठी साहित्याचा कळस गाठला.  

तर मित्रांनो, आपण आता आपल्या मराठी भाषेचा इतिहास बघितला, खरतर मराठी भाषेचा बराच मोठा इतिहास आहे, तुमच्यापुढे काही महत्वाचे मुद्देच मांडले. मराठी भाषा ही सगळ्यात सोपी आणि सरळ भाषा असून त्याला एक ताल आहे, एक लय आहे, एक आकार आहे. ज़्या भाषेचे आरोह आणि औरवा अगदीच्च सरळ आहे. या भाषेची धारच इतकी जास्त अाहे जितकी कोणच्या तलवारित ही नाही. या भाषेचे एक नवल म्हंटले म्हणजे या भाषेत भाषण प्रस्तुत केले तरी, मग ते कोणच्या ही प्रकारचे भाषण असो प्रेमदै किव्वा रागपूर्वक भाषण, त्याची ताकत सारखीच असते. 

मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात बरेच काही थोर व्यक्ति आहेत ज्यांना मराठी भाषेचा भरपूर अभिमान वाटतो व त्यांनी मराठी भाषेतना बरेच काही मिळवलेले आहेत, ते म्हणजे महान राजकारणी, ज्यांनी मराठी भाषेला सर्वात मोठा दर्ज़ा दिला आहे, राज ठाकरे, उत्तम कलाकर नाना पाटेकर व नाटककार दिलीप प्रभावलकर व प्रशांत दामले. अश्या या व्यक्तिं मुळे आपली मराठी भाषा अजुन नवा पहाड़ उभारते आहे असे नक्कीच म्हणू शक्तो. तसे या व्यक्तिं मधे अजुन एक थोर पुरुष म्हणजे योद्धा राजा छत्रपति शिवाजी महाराज. 

मित्रांनो, मला हे सांगण्यात इतका वाइट वाटता आहे की मराठी भाषेचा उपयोग आजच्या तरुणां मधे फारच क्वचित होतो आहे. आजकाल तर तरुण सामाजिक नेटवर्क फेसबुक, वॉट्सएप्प व इतर, वर बोलणे पण इंग्रजीत सुरु झाले आहेत. मराठी भाषा कमी आणि इंग्रजी भाषेचा जस्त उपयोग होतो आहे, मी असे बिल्कुलच म्हणंणे नाही आहे की इतर भाषेवर दुर्लक्ष करा पण आपल्या मातृभाषा मराठीला विसरु नका, त्याचा अभिमान व आदर वाटू द्या. महाराष्ट्राला आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा फायदा करून द्या. परभाषा जरी अवगत झाली आणि परदेशात गेलेत तरी आपल्या मराठी भाषेला विसरु नका. प्रत्येक मराठी माणसाला मराठी भाषा बोलता, लिहिता- वाचता आली पहिजे. आपल्या मराठितसुद्धा खुप विषयावर लेखन झाले आहे. शास्त्र- विज्ञान, ललित साहित्य खुप आहे. 
          मातृभाषेचा उदोउदो करा, महाराष्ट्राचा जयजयकार करा. 


No comments:

Post a Comment